सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुढील महिन्यापासून, बँक खाती आणि लॉकर्सबाबत मोठी सवलत मिळणार आहे. आता तुम्ही तुमच्या बँक खात्यासाठी आणि लॉकरसाठी एकाऐवजी चार जणांना नामांकित करू शकता.हे नवीन नियम १ नोव्हेंबर २०२५ पासून लागू होणार आहे.
या नवीन नियामुळे ग्राहकांना खूप जास्त फायदा होणार आहे. ग्राहकांची पैसे सुरक्षित राहतील याचसोबत सर्व प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी हा निर्णय जारी केला.
अर्थ मंत्रालयाने बँकिंग कायदा (दुरुस्ती),२०२५ मध्ये महत्त्वाचे कलम लागू केले. हे पुढच्या महिन्यापासून लागू होतील. यामध्ये तुम्ही आता बँक अकाउंट, लॉकर किंवा इतर वस्तू ज्या लॉकरमध्ये ठेवल्यात त्यांच्यासाठी नॉमिनी लावू शकतात. तुम्हाला याआधी फक्त एक किंवा दोन नॉमिनी लावण्याची परवानगी होती. त्यानंतर आता हा नियम बदलला आहे. तुम्ही ४ वारसदार लावू शकतात. बँकिंग कायद्यातील काही नियम लागू झाले आहेत. काही नियम १० नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.
नवीन नियमानुसार तुम्ही चार नॉमिनी निवडू शकतात. जर तुम्ही पहिला नॉमिनी निवडला तो व्यक्ती जर हयात नसेल तर दुसरा व्यक्ती आपोआप नॉमिनी होईल. तेच ग्राहक स्वतः हे पैसे चार नॉमिनीमध्ये किती वाटायचे हे ठरवू शकतात. याचा निर्णय स्वतः ग्राहक किंवा खातेधारक घेईल.
लॉकरचे नियम
सेफ कस्टडी आणि लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंसाठी क्रमाने नॉमिनीची अनुमती असेल.म्हणजे पहिल्या नॉमिनीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याला अधिकार मिळेल. यामुळे बँकिंग व्यवस्थेत पारदर्शकता राहिल. ग्राहकांना त्यांच्या मर्जीने वारसदार ठरवता येईल.















Discussion about this post