बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने 206 स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार 26 ऑगस्ट 2026 पर्यंत बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात.
या भरतीद्वारे डिजिटल बँकिंग, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, सिक्युरिटी, एंटरप्राइज डेटा मॅनेजमेंट ऑफिस, कॉर्पोरेट अकाउंट्स अँड टॅक्सेशन प्लॅनिंग, फॅसिलिटी मॅनेजमेंट आदी विविध विभागांमध्ये नियमित पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.
या भरती मोहिमेत मॅनेजर, सिनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर, टेक्निकल ऑफिसर, प्रॉडक्ट मॅनेजर, डेटा सायंटिस्ट, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर, सिक्युरिटी मॅनेजर तसेच कर आकारणीशी संबंधित विविध पदांचा समावेश आहे.
पात्रता काय?
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. वयोमर्यादेची गणना 1 ऑगस्ट 2026 रोजीच्या स्थितीनुसार केली जाईल.
अर्ज शुल्क :
सर्वसाधारण / OBC / EWS : ₹850 + पेमेंट गेटवे शुल्क
SC / ST / दिव्यांग / माजी सैनिक / महिला : ₹175 + पेमेंट गेटवे शुल्क
शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.
निवड प्रक्रिया
अर्जांची छाननी झाल्यानंतर आवश्यकतेनुसार ऑनलाइन परीक्षा घेतली जाऊ शकते. त्यानंतर सायकोमेट्रिक चाचणी, गटचर्चा (Group Discussion) आणि वैयक्तिक मुलाखत होईल. अंतिम निवडीपूर्वी कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल.
ऑनलाइन परीक्षा झाल्यास 150 प्रश्न, 225 गुण आणि 150 मिनिटांचा कालावधी असेल. परीक्षेत तर्कशक्ती, इंग्रजी, संख्यात्मक क्षमता आणि व्यावसायिक ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची निगेटिव्ह मार्किंग लागू असेल.
अर्ज कसा कराल?
बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Careers विभागातील Current Opportunities लिंकवर क्लिक करा.
संबंधित भरतीची अधिसूचना निवडून नोंदणी करा.
अर्जातील आवश्यक माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट किंवा PDF जतन करून ठेवा.















Discussion about this post