Monday, August 31, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गायीच्या दुधात सोयाबीन तेलाची भेसळ! ‘म्हशीचे दूध’ म्हणून धुळ्यात विक्री; अमळनेरमध्ये भेसळीचा पर्दाफाश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 31, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
दूध उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी
बातमी शेअर करा..!

जळगाव : दूध म्हणजे आरोग्यासाठी पोषक पदार्थ; मात्र याच दुधात भेसळ करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार अमळनेर तालुक्यात समोर आला आहे. गायीच्या दुधाची फॅट वाढवण्यासाठी त्यात सोयाबीन तेल मिसळले जात होते आणि हे भेसळयुक्त दूध चक्क ‘म्हशीचे दूध’ म्हणून धुळे शहरात विक्रीसाठी पाठवले जात होते. जानवे येथे अन्न व औषध प्रशासन आणि अमळनेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हा प्रकार उघडकीस आणला.

जानवे ते इंदापिंप्री रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये गोठ्याच्या आड हा प्रकार सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रविवारी (३० ऑगस्ट) दुपारी साडेतीनच्या सुमारास पथकाने अचानक छापा टाकला. त्यावेळी महेश दिलीप पाटील (२७, रा. जानवे) हा गायीच्या दुधात सोयाबीन तेल मिसळताना आढळून आला.

१०० लिटर दुधात भेसळीचा खेळ

तपासात भेसळ करण्याची पद्धत समोर आली. १० लिटर भेसळयुक्त दूध तयार करून ते १०० लिटर गायीच्या दुधात मिसळले जात होते. त्यानंतर या दुधाला म्हशीचे दूध असल्याचे भासवून धुळे शहरात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे समोर आले. कारवाईदरम्यान पथकाने ४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आकाश कैलास बोऱ्हाडे (३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर काही तासांतच महेश पाटील याला अटक केली. अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारताच्या मान्सूनवर मोठं संकट! पाऊस १४ टक्के कमी, एल निनोचा धोका वाढला

Next Post

सुप्रीम कोर्टाचा कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलानावर मोठा निर्णय; थेट केंद्र सरकार, दिल्ली पोलिसांना धाडली नोटिस

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post

सुप्रीम कोर्टाचा कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलानावर मोठा निर्णय; थेट केंद्र सरकार, दिल्ली पोलिसांना धाडली नोटिस

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बँकेत नोकरीची संधी! ४०० पदांसाठी सुरूय भरती, आजच अर्ज करा

इंडियन ओव्हरसीज बँकेत २९१ पदांसाठी भरती; पात्रता काय? तपासून घ्या

August 31, 2026

सुप्रीम कोर्टाचा कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलानावर मोठा निर्णय; थेट केंद्र सरकार, दिल्ली पोलिसांना धाडली नोटिस

August 31, 2026
दूध उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी

गायीच्या दुधात सोयाबीन तेलाची भेसळ! ‘म्हशीचे दूध’ म्हणून धुळ्यात विक्री; अमळनेरमध्ये भेसळीचा पर्दाफाश

August 31, 2026
भारताच्या मान्सूनवर मोठं संकट! पाऊस १४ टक्के कमी, एल निनोचा धोका वाढला

भारताच्या मान्सूनवर मोठं संकट! पाऊस १४ टक्के कमी, एल निनोचा धोका वाढला

August 31, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page