Thursday, October 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अट्रावल मारहाण प्रकरणाला नवा ट्विस्ट! फरार निलंबित पोलीस शिपायाचे अखेर आत्मसमर्पण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 24, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
यावल तहसील कार्यालय परिसरात वाहन चोरीचा प्रयत्न हाणून पाडला
बातमी शेअर करा..!

यावल । यावल तालुक्यातील अट्रावल येथे महिला आणि तिच्या मुलीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेला निलंबित पोलीस शिपाई अनिल तायडे अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने रविवारी (२३ ऑगस्ट) यावल पोलीस ठाण्यात स्वतः हजर होत आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

ग्रामसभा सदस्यत्वाच्या वादातून वाद विकोपाला

अट्रावल येथे २८ मार्च २०२६ रोजी ही घटना घडली होती. फिर्यादी विजया तायडे (६०) आणि आरोपी अनिल तायडे हे नातेवाईक असून, अनिल तायडे यांच्या पत्नीचा आणि विजया तायडे यांचा ग्रामसभा सदस्यत्वावरून जुना वाद होता. याच वादातून घटनेच्या दिवशी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला.

यावेळी विजया तायडे यांना शिवीगाळ करून त्यांच्यासोबत मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांच्या मुलीला, आरतीलाही मारहाण करण्यात आली. या प्रकारात आरतीच्या डोक्याला लोखंडी रॉडने गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांकडे दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अनिल तायडे याच्यासह सागर तायडे आणि माया तायडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

पाच महिन्यांपासून फरार

गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल तायडे अटकेच्या भीतीने फरार होता. पोलिसांनी तपास पूर्ण करून ३० जुलै रोजी अन्य आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. अनिल तायडे अटक झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध पूरक दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे तपासात नमूद करण्यात आले होते. दरम्यान, अटकेपासून बचाव करण्यासाठी अनिल तायडे याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, २३ ऑगस्ट रोजी न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर त्याने यावल पोलीस ठाण्यात हजर होण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांनी केली अटक

अनिल तायडे याने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करताच यावल पोलिसांनी त्याला अटक केली. आता त्याच्याविरुद्ध BNSS कलम १९३ नुसार पूरक दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस विभागाने अनिल तायडे याच्यावर विभागीय कारवाई केली होती. ३१ मार्च रोजी त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आणि २८ जून रोजी चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला.

चौकशीच्या अहवालानंतर २१ ऑगस्ट रोजी त्याची दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याचा आदेश देण्यात आला. याबाबतची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.हायकोर्टाचा जामीन नाकारल्यानंतर अखेर फरार पोलीस शिपायाला पोलिसांसमोर हजर व्हावे लागले असून, आता या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईकडे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बळीराजाची चिंता वाढली; जळगावात पावसाची उघडीप कायम; वाचा हवामान विभागाचा नवा अंदाज

Next Post

आर्मर्ड व्हेईकल्स निगममध्ये १,२१३ पदांची मोठी भरती; ३१ जुलैपर्यंत अर्जाची संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

आर्मर्ड व्हेईकल्स निगममध्ये १,२१३ पदांची मोठी भरती; ३१ जुलैपर्यंत अर्जाची संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

October 8, 2026
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

ठाकरेंच्या अडचणी वाढणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने पुन्हा उपस्थित केला ‘पक्षघटने’चा मुद्दा

October 8, 2026
अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

October 8, 2026
खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

October 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page