Friday, November 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावमध्ये रंगणार मराठी नाटकांचा उत्सव; २२ नोव्हेंबरपासून नाट्यस्पर्धेला सुरुवात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 20, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावमध्ये रंगणार मराठी नाटकांचा उत्सव; २२ नोव्हेंबरपासून नाट्यस्पर्धेला सुरुवात
बातमी शेअर करा..!

जळगाव । सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरीसाठी नाट्यसंस्थांच्या तालमींना जोरदार सुरुवात झाली आहे. शहरातील महाकवी कालिदास सभागृह मनभावन इमारत, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, एकलव्य क्रीडा संकुलसमोर, जळगाव येथे दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ पासून या स्पर्धेला प्रारंभ होणार असून, दररोज सायंकाळी ७ वाजता नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे जळगाव व परिसरातील नाट्यरसिकांना दिवाळीनंतर दर्जेदार नाट्यप्रयोगांची मेजवानी अनुभवता येणार आहे.

महाराष्ट्राला समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा लाभला आहे. या परंपरेचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच हौशी कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी राज्य नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध नाट्यसंस्थांमधील कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ यांना आपली कलाकृती सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीच्या स्पर्धेत जळगाव, नंदुरबार व इंदोर जिल्ह्यातील एकूण १५ नाट्यसंस्था प्राथमिक फेरीत सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या तयारीसाठी कलाकार आपापल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून तालमी करत आहेत. संवादफेक, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा आणि रंगमंचावरील हालचाली यांचा कसून सराव सुरू आहे.

यंदाच्या स्पर्धेत विविध विषयांवरील नाटके सादर होणार असल्याने प्रेक्षकांना वेगवेगळ्या आशयांचे आणि नाट्यशैलींचे दर्शन घडणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी नाट्यसंस्थांमध्ये कलात्मक चुरस पाहायला मिळणार असून, कलाकारांच्या मेहनतीचा आणि सर्जनशीलतेचा अनुभव नाट्यरसिकांना घेता येणार आहे.

महाकवी कालिदास सभागृह
मनभावन इमारत, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, एकलव्य क्रीडा संकुलसमोर, जळगाव येथे होणाऱ्या या स्पर्धेतील नाट्यप्रयोगांना नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हौशी कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल

Next Post

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण; दरमहा मिळणार १ हजार रुपये

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सूर्य तापू लागला! शालांत परीक्षेबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण; दरमहा मिळणार १ हजार रुपये

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

आजच्या आज माझी नार्को टेस्ट करा, पण..; रोहित पवारांचं सरकारला थेट आव्हान

November 20, 2026
जामनेरमध्ये गावठी दारूविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट, चौघांवर गुन्हे

जामनेरमध्ये गावठी दारूविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट, चौघांवर गुन्हे

November 20, 2026
अभियांत्रिकी पदवी असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीचा चान्स; १५४३ जागांसाठी भरती सुरु

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत ३१९ जागांसाठी भरती

November 20, 2026
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

November 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page