नवी दिल्ली । केंद्र सरकारने आज तीन लोकांना भारतरत्न सन्मान जाहीर केला. त्यात माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते नरसिंह राव, चौधरी चरण सिंग आणि शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचा समावेश आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे. तसेच बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनाही भारतरत्न जाहीर केला गेला आहे. आता केंद्र सरकारने दोन माजी पंतप्रधान आणि एका शास्त्रज्ञांना देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.
काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करताना पीएम मोदी म्हणाले, ‘माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्ष खासदार व विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहणार आहे.















Discussion about this post