जळगाव । जळगाव जिल्ह्यात कापूस हंगाम केव्हाच संपला तरी पण कापसाला भाव नाहीय. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दुसरीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट व्यापारी करत असल्याचे आता समोर आले आहे. व्यापाऱ्यांकडून शासनाने कापसाचे हमीभाव ठरवून दिले असतानाही हमीभावापेक्षाही कमी दरात कापूस खरेदी केला जात आहे.
शासकीय कापूस खरेदी ७ हजार २० रुपयांनी होत आहे.तर व्यापारी कापसाला पाच हजार ते ६ हजार ८०० चा दर देत आहेत. व्यापाऱ्यांकडून तब्बल पाचशे ते सातशे रुपयांच्या तुटीवर कापूस खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
यंदा कापसाला भाव मिळत नसल्याने शासनाने हमीभाव ठरवून दिले. मात्र व्यापाऱ्यांकडून सरकारच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवली गेली आहे. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी तब्बल पाचशे ते सातशे रुपयांच्या तुटीवर कापूस खरेदी करत आहे.
५० टक्के कापूस घरातच
चांगल्या दराअभावी अद्यापही शेतकऱ्यांनी ५० टक्के कापूस विकला नाही. किमान आठ ते नऊ हजारांचा दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
उत्पादनात बारा लाख गाठींची घट
गतवर्षी आक्टोबर ते सप्टेंबर या कापूस वर्षात १९ लाख गाठी तयार करण्यात आल्या. यंदा आतापर्यंत केवळ सात लाख गाठींची निर्मिती झाली आहे. कापूस बाजारात येत नसल्याने कापसावर अवलंबून असलेली सर्वच प्रक्रीया बंद पडल्याचे चित्र आहे.















Discussion about this post