जळगाव । जळगावातील बिलवाडी गावातील रस्ते जलकुंभ स्मशानभूमीसह दहा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मिश्किल वक्तव्य केलं.
ज्या नेत्यांच्या मागे कार्यकर्त्यांचा पाठिंबा असतो, तोच नेता मोठा असतो. आता पुढारी लोकांना वेडं करत नाहीत तर लोकं पुढाऱ्यांना वेडं करतात. पक्षांची दुकानंच एवढी झालीत. आम्हाला कार्यकर्ते सांभाळणंही एवढं मुश्किल झालंय असं वक्तव्य गुलाबराव पाटीलांनी केलं.
तू नाही दिलं जातो की भाजप मध्ये..भाजप मध्ये नाही दिलं, मी जातो शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये.. राष्ट्रवादीत नाही मिळालं तर मी तर जातो बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये.. असं सुरु आहे’ असंही गुलाबराव पाटील म्हणाले















Discussion about this post