जळगाव । जामनेर तालुक्यातील पहूर येथे आरक्षणातील घुसखोरी थांबविण्यासाठी आज विमुक्त जाती अ प्रवर्गातील समाजबांधवानी रास्तारोको आंदोलन केलं. परंतु आंदोलन करणाऱ्या संतप्त जमावांनी वाहनांची तोडफोड केल्याने आंदोलन चिघळलं आहे. यावेळी वाहतूक कोंडीही झाली आहे.
गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि सकल विमुक्त जातीच्या सर्व संघटनांनी हे आंदोलन छेडलं आहे. विमुक्त जातीच्या खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाईसह विविध मागण्यासाठी विमुक्त जाती प्रवर्गातील समाज बांधव आक्रमक झाले आहेत.
याआंदोलनात मोठ्या संख्येने वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील विमुक्त जाती अ प्रवर्गातील समाज बांधव सहभागी झाले होते. या आंदोलकांनी रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करत रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. तर काही आंदोलकांनी थेट वाहनांनाच लक्ष्य केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच मंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. मागण्या मान्य झाल्या नाहीतर सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत मतदान करणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देवू, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.















Discussion about this post