जळगाव : लग्न लावून देत नसल्याच्या रागातून मुलानेच जन्मदात्या पित्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील पिळोदा येथे घडली. रतन तानसिंग कोळी (७३) असे मृत व्यक्तीचे नाव असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील पिळोदा येथे रतन कोळी हे पत्नी शुबाबाई कोळी आणि मुलगा देवानंद कोळी यांच्यासोबत वास्तव्याला असून काल रात्री मुलगा देवानंद कोळी याने माझे लग्न लावून देत नाही, किंवा लग्नासाठी पैसे देत नाही असे वडील रतन कोळी यांना सांगून वाद घातला. याकडे वडील रतन कोळी यांनी टाळाटाळ केली.
याचा राग असल्याने संतापाच्या भरात घरात असलेली लोखंडी कुऱ्हाडीने झोपलेले असतांना वडील रतन कोळी यांच्यावर वार करून खून केला. याबाबत संशयित आरोपी देवानंद कोळी याला अटक करण्यात आली. याप्रकरणी शबाबाई कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा देवानंद कोळी याच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पिळोदा गावात घटनास्थळी फैजपुरच्या डीवायएसपी अन्नपुर्णा सिंह यांच्यासह पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्यासह पोलीस पथकाने भेट दिली असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.















Discussion about this post