नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये (UIIC) नवीन जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवार या पदांसाठी अधिकृत वेबसाईट uiic.co.in वर 23 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
ही पदे भरली जाणार?
या भरती मोहिमेद्वारे अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदांसाठी भरती होईल.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 31 डिसेंबर 2023 पर्यंत 21 वर्षं असावं. नियमानुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही सूट मिळेल.
आवश्यक पात्रता :
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे 31 डिसेंबर 2023 पर्यंत पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तसंच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह (SC/ST श्रेणीसाठी 55%) पदवी घेतलेली असणं आवश्यक आहे.
कशी होईल उमेदवारांची निवड
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची भरती करेल. ऑनलाइन लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल.
अर्ज फी
या भरतीसाठी जनरल कॅटेगरीतील सर्व उमेदवारांना 1000 रुपये अर्ज फी भरावी लागेल. तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग आणि पीएसजीआय कंपनीच्या कायमस्वरूपी उमेदवारांना फक्त 250 रुपये फी भरावी लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2024















Discussion about this post