जळगाव । सहा महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीची धग अजून कायम असतानाच आता पुन्हा राजकीय भूंकप होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
“बघा,निवडणुकीच्या आधीच होईल.आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय-काय घडतंय. पण निश्चित निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या 15 ते 20 दिवसांत मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील”, असं महाजन म्हणाले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आता पुढचा नंबर काँग्रेसचा असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून बोलले जात आहे. त्यात काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांभोवती संशयाचं दाट धुकं आहे.त्याच पार्श्वभूमीवर मोदी-शाह जोडी लोकसभेआधी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा डाव टाकण्याची शक्यता आहे.त्यात लवकरच विधानसभा अध्यक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निर्णय देण्याची शक्यता आहे.याच धर्तीवर मंत्री गिरीश महाजनांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.















Discussion about this post