जळगाव । राम हा मांसाहारी होता, असं विधान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं असून त्यांच्या या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. भाजपने आव्हाड यांच्या या विधानावर जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन होत आहे. दरम्यान, आता आव्हाड यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली.
प्रभू श्रीराम यांच्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत असून ते मत संघटनेचे वाटत नाही, असे मत खडसे यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक काळात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करू नका, असा सल्लाही खडसे यांनी दिला. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ’ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची’ या मंथन शिबिरात खडसे बोलत होते.
खडसे म्हणाले की, राज्यातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. महिला, मुलींवर आत्याचार वाढले आहेत. शेतमालाला भाव नाही, सत्ताधारी पक्षाच्या गुंडांना अभय दिले जाते. पोलिस यंत्रणा नाकाम झाली आहे. हेच मुद्दे घेऊन जनतेसमोर जा, असे आवाहन पदाधिकार्यांना केले.















Discussion about this post