जळगाव । राम मंदिर व्हावं, ही बाळासाहेबांची सुरुवातीपासूनची भूमिका होती. आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असलेल्या सरकारमध्ये राम मंदिर होत आहे.राममंदिराच्या वेळी पाळधीत १९९२ मध्ये दंगल झाली होती.माझ्या दोन भावांसह मलाही जेल झाली होती. आम्ही तिन्ही भाऊ कारागृहात होतो, याची कारागृहात नोंद आहे. त्यामुळे रामलल्लाच्या मंदिरासाठी आमचाही खारीचा वाटा आहे. असं राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
राममंदिराचा भारतीय जनता पक्ष इव्हेंट करीत आहेत, असा उद्धव ठाकरेंचा आरोप आहे. या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, की रामलल्ला हे कोणत्याही पक्षाचे नाहीत, ते सर्वांचे आहेत. परंतु कोणी त्यासाठी हिरिरीने भाग घेऊन काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. रामल्लाच्या २२ तारखेच्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण भाग घेत आहोत.
शेवटी रामलल्ला हे सर्वांचे आहेत. बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले राममंदिराच्या कार्यक्रमाबाबत ते म्हणाले, की बाळासाहेबांचे राममंदिर उभारणीचे जे स्वप्न होते ते साकार झाले आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांचा आनंद निश्चितच द्विगुणित झाला असता. राममंदिर साकार व्हावे, हीच बाळासाहेबांची इच्छा होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ते साकार होते आहे. त्याचा आम्हाला आणि संपूर्ण भारतवासीयांना आनंद आहे.















Discussion about this post