मुंबई : राज्यातील संत्रा उत्पादकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सरकारने नागपूर, अमरावती, बुलढाणा येथे ८ आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यास मान्यता दिली आहे. आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीसाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची उभारणी करण्यासाठी राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागाने अध्यादेश काढून मान्यता दिली. यामुळे संत्रा प्रक्रिया आणि साठवणुकीच्या उद्योगाला चालना मिळणार असून संत्रा उत्पादकांना चार पैसे जास्त मिळण्याची शक्यता झाली आहे.
विदर्भातील नागपूर, काटोल आणि कळमेश्वर, जि. नागपूर व मोर्शी, जि. अमरावती व संग्रामपूर, जि. बुलढाणा येथे हे संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार आहेत. नागपूरमध्ये नागपूर,काटोल आणि कळमेश्वर येथे प्रत्येकी १ संत्रा प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. अमरावतीत मोर्शी येथे ३ संत्रा प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. तर बुलढाण्यात संग्रामपूर येथे २ संत्रा प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. तर या तीन जिल्ह्यात १६ संत्रा दुय्यम प्रक्रिया प्रकल्प संख्या उभारले जाणार आहेत.

Discussion about this post