नाशिक । केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असल्याने, कांद्याचे दर घसरले आहेत. यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत या सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई- आग्रा महामार्गावर चांदवड चौफुलीवर रास्ता रोको आणि सभा घेतली याच सभेतून पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
“तुम्ही सगळे कष्ट करता, मात्र ज्यांच्या हातामध्ये देशाचे धोरण ठरवण्याचे अधिकार आहेत. त्यांच्यामध्ये तुमच्या कष्टांना किंमत देण्याची भावना नाही. कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात येत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. सत्ताधारी केंद्र सरकारमधील मंत्र्यांना जाणीव नसेल तर शेतकरी उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही.” असे पवार म्हणाले.
त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे. आम्हाला रस्त्यावर येण्याची हौस नाही, पण, रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही, असेही शरद पवार म्हणाले. नाशिक हे कांद्याचे महत्वाचे केंद्र आहे. निर्यातीत सरकारचा हस्तक्षेप नसावा. सरकारची ही धरसोड वृत्ती योग्य नाही, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
तुम्ही सगळे कष्ट करतायत, पण सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही. ज्यांच्या हातात धोरणं ठरविण्याचे अधिकार आहेत, त्यांना जाणं नसेल तर शेतकरी उध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. मी मागे मनमाडला आलो होतो, तेव्हा मला काही शेतकऱ्यांनी सांगितले की, कांदा संदर्भात काही निर्णय केंद्र सरकार घेत आहे. त्यामुळे मी कार्यक्रम थांबवून तत्काळ दिल्लीला गेलो. त्यावेळी, भाजपचे लोकं कांद्याच्या माळ गळ्यात घालून आले होते. याबाबत अध्यक्षांना विचारल्यावर कांद्याचे भाव खूप वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कांद्याचे दर कमी करता येणार नाही का? असे मला अध्यक्षांनी विचारले. त्यावर, दोन पैसे शेतकऱ्यांना मिळत असतील तर मिळू द्या असे मी त्यांना सांगितले,” असल्याच पवार म्हणाले.















Discussion about this post