मुंबई | ‘सीआयडी’ मालिकेच्या चाहत्यांसाठी दुखत बातमी आहे. या मालिकेमधील फेम फ्रेड्रिक्स म्हणजे दिनेश फडणीस याचं वयाच्या 57 व्या वर्षी निधन झालं आहे
गेल्या काही दिवसांपूसन दिनेश याची प्रकृती चिंताजनक होती. उपचारा दरम्यान दिनेश याने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. पण सोमवारी रात्री अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला..
सोमवारी रात्री 12 वाजता दिनेश फडणीस याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्यावर मंगळवारी 5 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार ‘सीआयडी’ शोची संपूर्ण टीम आताच्या घडीला दिनेश याच्या निवासस्थानी आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या निधनानंतर दुःख व्यक्त करत आहेत.
दिनेश फडणीस यांनी अनेक मालिका, शो, सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण दिनेश याला ‘सीआयडी’ मध्ये फ्रेड्रिक्स ही भूमिका साकारल्यानंतर लोकप्रियता मिळाली. ‘सीआयडी’ शो आता प्रसारित होत नसला तरी, शोमधील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
दिनेश फडणीस याला काय झालं होतं?
अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर फ्रेड्रिक्स याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली. पण अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला नसून ‘सीआयडी’ मधील दया याने फ्रेड्रिक्स याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली होती. फ्रेड्रिक्स याला हृदयविकाराचा झटका आला नसून अभिनेत्याचं यकृत निकामं (लिव्हर डॅमेज) झाल्याची माहिती दया याने दिली हेती.















Discussion about this post