जळगाव : जळगाव शहरातील नायरा पेट्रोल पंप परीसरातील इमारतीचे बांधकामाच्या ठिकाणी पाचव्या मजल्यावरून पडल्याने 26 वर्षीय परप्रांतीय मजूर ठार झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुदाम दिलीप शर्मा (26, दिनाजपूर, पश्चिम बंगाल, ह.मु.शिवकॉलनी, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
सुदाम दिलीप शर्मा हा कामानिमित्ताने जळगाव शहरातील शिवकॉलनी पीसरात वास्तव्याला होता. रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुदाम पेट्रोल पंप परिसरात इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करीत असताना रविवारी सायंकाळच्या सुमारास त्याचा तोल गेला व तो पाचव्या मजल्यावरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होवून मयत झाला.
सोबतच्या सहकार्यांनी त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.















Discussion about this post