मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने जोरदार तयारी सुरु केली असून यातच शिवसेना ठाकरे गटाचे विभागीय नेते जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी शिवसेनेने आज विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दहा नेत्यांवर राज्यातील विभागवार संघटनात्मक तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विशेष जबाबदारी सोपवली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी ‘नेते’ मंडळात वाढ करून नेत्यांची संख्या वाढवली व आता नेत्यांवर विभागवार बांधणीची जबाबदारी टाकून निवडणुकांच्या तयारीसाठी पुढचे पाऊल टाकले आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ,कोकण, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भाची जबाबदारी दहा नेत्यांवर सोपविण्यात आली आहे.
कोणत्या नेत्याकडे कुठली जबाबदारी ?
संजय राऊत- उत्तर महाराष्ट्र आणि पुणे
लोकसभा मतदारसंघ – नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिडीं, पुणे, बारामती, शिरूर, मावळ (विधानसभा पिंपरी, चिंचवड, मावळ)
अनंत गीते – कोकण (रायगड)
लोकसभा मतदारसंघ : रायगड, मावळ (विधानसभा – पनवेल, कर्जत, उरण)
चंद्रकांत खैरे: मराठवाडा
लोकसभा मतदारसंघ : संभाजीनगर, जालना
खासदार अरविंद सावंत- पश्चिम विदर्भ
लोकसभा मतदारसंघ: बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ – वाशिम, वर्धा
खासदार अनिल देसाई: पश्चिम महाराष्ट्र
लोकसभा मतदारसंघ : सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी
आमदार भास्कर जाधव: पूर्व विदर्भ
लोकसभा मतदारसंघ : नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर
खासदार विनायक राऊत: कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग)
लोकसभा मतदारसंघ: रत्नागिरी, सिंधुदुर्ग
खासदार राजन विचारे: कोकण (ठाणे, पालघर)
लोकसभा मतदारसंघ : ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर
आमदार रवींद्र वायकर : मराठवाडा
लोकसभा मतदारसंघ: नांदेड, हिंगोली, परभणी
आमदार सुनील प्रभू : मराठवाडा, सोलापूर
लोकसभा मतदारसंघ: सोलापूर ,धाराशिव, लातूर, बीड















Discussion about this post