चाळीसगाव । नाशिक जिल्ह्यात अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना ताजी असतांनाच जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथील कन्नड घाटात मध्यरात्री दूसरा भीषण अपघात झाला. अक्कलकोट येथून दर्शन घेऊन परत येत असणाऱ्या भाविकांची कार दरीत कोसळून चौघांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले आहे.
मृतांमध्ये दोन महिला आणि एका परूषांचा समावेश आहे. तसेच ८ वर्षांच्या मुलीचा देखील या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
प्रकाश गुलाबराव शिर्के (वय ६५), शिलाबाई प्रकाश शिर्के, वय वय ६०), वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय ३५), पूर्वा गणेश देशमुख ( वय ८) अशी अपघात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर, अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०), जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०), सिधेस पुरुषोत्तम पवार, (वय १२), कृष्णा वासुदेव शिर्के (वय ४), रूपाली गणेश देशमुख (वय ३०), पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय ३५), वाहन चालक अभय पोपटराव जैन (वय ५०) अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव येथील काही भाविक हे अक्कलकोट येथे तवेरा गाडीने दर्शनासाठी गेले होते. यावेळी दर्शन घेऊन परत मालेगावकडे प्रवास करत होते. चाळीसगाव येथील कन्नड घाटात मोठ्या प्रमाणात धुके तसेच अंधार होता. यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी कन्नड घाटातील दरीत कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता ही चौघांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.















Discussion about this post