मुंबई । ऐन दिवाळीत राज्यावर अवकाळीचे संकट आले असून यामुळे बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तर काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस देखील कोसळत आहेत. दरम्यान येत्या २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर काही भागांत ढगाळ वातावरण राहणार असून थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत मुंबईसह, पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला.
या भागात इशारा
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस (Rain Alert) पडण्याचा अंदाज आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
या पावसामुळे खरीप हंगामातील पीकांचं नुकसान झालं. कोकणात भातशेतीचं नुकसान झालं. विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने काढणीला आलेली हरबरा तसेच सोयाबीन पिके पाण्यात भिजली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, हवामान खात्याने देशासह राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.















Discussion about this post