मुंबई । अल-निनो वादळाच्या संकटामुळे यंदा मान्सून काळात अत्यल्प पावसाची नोंद झाल्यामुळे येत्या काळात पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. यातच आता राज्यावर पावसाचे सावट आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रातही वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.
पुढील 24 तासात अनेक ठिकाणी जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.
मागील दोन दिवसापासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस बरसत आहे.पुढील दोन दिवसही या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात पडत असलेल्या पावसामुळे आंबा पिकांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे. मागील वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही मागील दोन दिवसापासून होत असलेल्या पावसाने शेतकरी देखील चिंतेत आहे.
मुंबईतमधील काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबईतील पश्चिम उपनगरे तसेच मध्य उपनगरात रात्री 8 नंतर अचानक पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पुढील 2 दिवस मुंबईसह उपनगरात पावसाची शक्यता आहे.















Discussion about this post