मुंबई । आज मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना बेपत्ता महिलांच्या मुद्दावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार शिंदे-फडणवीस सरकारवर कडाकडले आहेत.
पावसाळी अधिवेशनात अनिल देशमुख यांनी प्रश्न विचारला होता की, 1 जानेवारीपासून 1 मेपर्यंत किती महिला बेपत्ता आहेत, याचं उत्तर मिळालं की 19 हजार 553 महिला बेपत्ता आहेत. याचं रेकॉर्ड देखील आहे, असं म्हणत शरद पवार सरकारला धारेवर धरले. ‘ही राज्याची स्थिती असेल तर हे अवघड आहे. 18 वर्षा खालील 1453 मुली आहेत आणि उर्वरित महिला आहेत. हे सरकारने लेखी उत्तर दिलं आहे. आपण अशा प्रश्नांवर गप्प बसायचं का?’ असंही पवार म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांनी कंत्राटी भरतीवरूनही हल्लाबोल केला. ”सरकारी नोकरी कमतरता आहे. एका बाजूला नोकऱ्या नाहीत आणि दुसरीकडे रिक्त जागा मोठ्या आहेत. यातच सरकार कंत्राटी पदावर नेमणुका करत आहेत, हे योग्य नाही.















Discussion about this post