मुंबई : राज्यातील काही ठिकाणी पाऊस होतं आहे आहे तर काही ठिकाणी उघडदीप दिली आहे. दरम्यान येत्या 24 तासात राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामान खात्याने आज मुंबई, पुणे ठाणे, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर कोकणाला ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. याशिवाय मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
रविवारी आणि सोमवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला होता. त्यांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला. मराठवाडा, विदर्भ तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या.
आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस?
हवामान खात्याने आज म्हणजेच मंगळवारी दुपारी किंवा संध्याकाळी मुंबई, पुणे, ठाणे, पालघर आणि कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय उपनगरात देखील पावसाच्या सरी बरसणार आहे. दुसरीकडे मराठवाडा, विदर्भ, मध्यमहाराष्ट्र आणि इतर भागात मेघगर्जनेसह पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.















Discussion about this post