Friday, November 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यातील अंगणवाडी सेविका-मदतनीसांसाठी खुशखबर! आता मिळणार २ हजारांपर्यंत प्रोत्साहन भत्ता; सरकारचा नवा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 27, 2026
in महाराष्ट्र
0
खुशखबर अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार ‘भाऊबीज भेट’
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागाने प्रोत्साहन भत्त्याच्या नियमांमध्ये बदल केला असून, आता अंगणवाडी केंद्रांच्या कामाचे दर महिन्याला १० निकषांवर मूल्यांकन केले जाणार आहे. या निकषांची पूर्तता केल्यानुसार अंगणवाडी सेविकांना १ हजार ४०० ते २ हजार रुपये, तर मदतनीसांना ७०० ते १ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. नोव्हेंबर २०२६ पासून हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

१० पैकी किमान ७ निकष पूर्ण करणे आवश्यक
नव्या शासन निर्णयानुसार, अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी निर्धारित १० पैकी किमान ७ निकष पूर्ण करणे बंधनकारक आहे. केंद्राने किती निकष पूर्ण केले आहेत, यावर सेविका आणि मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्याची रक्कम निश्चित केली जाणार आहे.

सात निकष पूर्ण केल्यास अंगणवाडी सेविकेला १ हजार ४०० रुपये, तर मदतनीसाला ७०० रुपये मिळतील. आठ निकष पूर्ण केल्यास सेविकेला १ हजार ६०० रुपये आणि मदतनीसाला ८०० रुपये मिळणार आहेत. नऊ निकष पूर्ण केल्यास सेविकेला १ हजार ८०० रुपये आणि मदतनीसाला ९०० रुपये मिळतील. तर सर्वच्या सर्व दहा निकष पूर्ण केल्यास सेविकेला २ हजार रुपये आणि मदतनीसाला १ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.

कोणते आहेत नवीन १० निकष?
अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजाचे मूल्यांकन करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने १० निकष निश्चित केले आहेत. यामध्ये दर महिन्याला किमान दोन समुदाय आधारित कार्यक्रमांचे आयोजन करणे, पात्र लाभार्थ्यांना महिन्यातील किमान २५ दिवस घरपोच आहार देणे आणि तीन ते सहा वर्षे वयोगटातील किमान ८० टक्के बालकांची उपस्थिती राखणे यांचा समावेश आहे.

याशिवाय, किमान ९५ टक्के बालकांना महिन्यातील २५ दिवस गरम ताजे जेवण आणि नाश्ता देणे, दर महिन्याला आहार आरोग्य दिन आयोजित करून त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद करणे आवश्यक आहे. अंगणवाडी केंद्र महिन्यात किमान २५ दिवस सुरू ठेवावे लागणार असून, फेब्रुवारी महिन्यासाठी ही अट २४ दिवसांची असेल. तीन ते सहा वर्षांच्या मुलांसाठी किमान दोन पूर्वशालेय शिक्षण उपक्रम राबवणे, बालकांची उंची आणि वजनाची अचूक नोंद ठेवणे तसेच सर्व लाभार्थ्यांच्या गृहभेटी पूर्ण करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

पोषण ट्रॅकरच्या आधारे होणार मूल्यांकन
अंगणवाडी केंद्रांचे मूल्यांकन दर महिन्याला पोषण ट्रॅकर अॅपमधील माहितीच्या आधारे केले जाणार आहे. त्यामुळे सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी निर्धारित निकषांची पूर्तता करावी लागणार आहे. या निर्णयामुळे अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजावर अधिक लक्ष ठेवले जाणार असून, बालकांच्या पोषण आणि पूर्वशालेय शिक्षणाच्या गुणवत्तेलाही प्राधान्य मिळणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

साखरेचे भाव गगनाला भिडणार? साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज

Next Post

जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा ‘ऑल आऊट’ दणका; तब्बल २,२०० वाहनांची तपासणी करत लाखोंचा दंड वसूल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा ‘ऑल आऊट’ दणका; तब्बल २,२०० वाहनांची तपासणी करत लाखोंचा दंड वसूल

जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा 'ऑल आऊट' दणका; तब्बल २,२०० वाहनांची तपासणी करत लाखोंचा दंड वसूल

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा ‘ऑल आऊट’ दणका; तब्बल २,२०० वाहनांची तपासणी करत लाखोंचा दंड वसूल

जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा ‘ऑल आऊट’ दणका; तब्बल २,२०० वाहनांची तपासणी करत लाखोंचा दंड वसूल

November 27, 2026
खुशखबर अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार ‘भाऊबीज भेट’

राज्यातील अंगणवाडी सेविका-मदतनीसांसाठी खुशखबर! आता मिळणार २ हजारांपर्यंत प्रोत्साहन भत्ता; सरकारचा नवा निर्णय

November 27, 2026
दीड महिन्यांत साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ ; आता एक किलोचा दर किती?

साखरेचे भाव गगनाला भिडणार? साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज

November 27, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

महाराष्ट्र काँग्रेसचा मोठा निर्णय, सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या स्थगित

November 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page