Friday, November 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 20, 2026
in महाराष्ट्र, शैक्षणिक
0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..
बातमी शेअर करा..!

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल केला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेतील अर्थशास्त्र विषयाच्या पेपरची वेळ बदलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रकाची माहिती घेऊनच परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

नवीन वेळापत्रकानुसार, बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची परीक्षा १७ फेब्रुवारी २०२७ रोजी दुपारच्या सत्रात घेतली जाणार आहे. हा पेपर दुपारी ३ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ६ वाजता संपेल. यापूर्वी हा पेपर सकाळच्या सत्रात घेण्याचे नियोजन होते. जुन्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत परीक्षा द्यावी लागणार होती. मात्र, आता या वेळेत बदल करण्यात आला आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी या बदलाबाबत माहिती दिली. मंडळाच्या पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या नऊ विभागांमधून दहावी व बारावीच्या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत.

या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाने ६ नोव्हेंबरपासून आपल्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या वेबसाइटवर जाऊन परीक्षेचे वेळापत्रक पाहता येणार आहे. दरम्यान, अर्थशास्त्राच्या पेपरच्या वेळेत केलेल्या बदलाशिवाय बारावी आणि दहावीच्या इतर विषयांच्या परीक्षांच्या तारखा व वेळांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर विषयांच्या परीक्षांबाबत काळजी करण्याची गरज नाही.

मंडळाने विद्यार्थ्यांना आणखी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. वेबसाइटवर दिलेले वेळापत्रक केवळ माहितीसाठी आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिले जाणारे छापील वेळापत्रक अंतिम मानले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा किंवा महाविद्यालयाकडून मिळालेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षेच्या तारखा आणि वेळ तपासावी. तसेच सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या अप्रमाणित वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोदी सरकारमधील मंत्री आमच्या संपर्कात; ८ महिन्यांत परिणाम दिसतील! राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Next Post

जळगावमध्ये रंगणार मराठी नाटकांचा उत्सव; २२ नोव्हेंबरपासून नाट्यस्पर्धेला सुरुवात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावमध्ये रंगणार मराठी नाटकांचा उत्सव; २२ नोव्हेंबरपासून नाट्यस्पर्धेला सुरुवात

जळगावमध्ये रंगणार मराठी नाटकांचा उत्सव; २२ नोव्हेंबरपासून नाट्यस्पर्धेला सुरुवात

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

आजच्या आज माझी नार्को टेस्ट करा, पण..; रोहित पवारांचं सरकारला थेट आव्हान

November 20, 2026
जामनेरमध्ये गावठी दारूविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट, चौघांवर गुन्हे

जामनेरमध्ये गावठी दारूविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट, चौघांवर गुन्हे

November 20, 2026
अभियांत्रिकी पदवी असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीचा चान्स; १५४३ जागांसाठी भरती सुरु

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत ३१९ जागांसाठी भरती

November 20, 2026
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

November 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page