मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये फडणवीस सरकारने ४ मोठे निर्णय घेतले. मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने कोणते ४ निर्णय घेतले हे आपण जाणून घेणार आहोत…
१) नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना सुरू करण्यात येणार आहे. गृह विभागाने राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस मिळणार आहे.१७५ पैकी ५० शस्त्र मिळवण्यात यश आले आहे. तर १२५ शस्त्र मिळवण्यासाठी सरकारने ही बक्षीस योजना सुरू केली. (गृह विभाग)
२) राज्यातील उच्च व तंत्र शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रात होऊ घातलेले बदल लक्षात घेऊन सुधारणा करण्यात येणार आहे. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
३) एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्याचा आता झोन-१ मध्ये समावेश होईल. झोन-४ वर्गवारी रद्द आणि विस्तारीकरण नियमातही बदल करण्यात आला आहे. (वस्त्रोद्योग विभाग)
४) पालघर जिल्ह्यासाठी पालघर येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय तसेच मुख्य दंडाधिकारी न्यायालयाची स्थापना होणार आहे. सरकारी वकील कार्यालयांसह अनुषांगिक पदांच्या निर्मितीस मंजुरी देण्यात आली. (विधि व न्याय विभाग)















Discussion about this post