पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) आणि बारावीच्या (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाच्या या घोषणेमुळे विद्यार्थ्यांमधील परीक्षेच्या तयारीला आता अधिक वेग येणार आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा पार पडणार आहेत.
महत्त्वाच्या तारखा एका नजरेत:
१. बारावी (इ. १२ वी) परीक्षा:
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन: बुधवार, २० जानेवारी २०२७ ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७.
लेखी परीक्षा: सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ ते गुरुवार, १८ मार्च २०२७.
२. दहावी (इ. १० वी) परीक्षा:
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन: गुरुवार, २८ जानेवारी २०२७ ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७.
लेखी परीक्षा: सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ ते सोमवार, १५ मार्च २०२७.
विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना:
अधिकृत संकेतस्थळ: हे अंतिम वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ६ नोव्हेंबर २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. छापील वेळापत्रकच अंतिम: संकेतस्थळावरील वेळापत्रक केवळ विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आहे. शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत छापील (Printed) स्वरूपात मिळणारे वेळापत्रकच अंतिम ग्राह्य धरण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी छापील स्वरूपातील वेळापत्रकावरूनच परीक्षांच्या तारखांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका: सोशल मीडिया किंवा व्हॉट्सॲपवर अनेकदा बनावट वेळापत्रके व्हायरल होतात. अशा कोणत्याही अफवांवर विद्यार्थ्यांनी व पालकांनी विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट निर्देश मंडळाने दिले आहेत.















Discussion about this post