Friday, November 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

ग्रामपंचायतीत प्रशासकीय भूकंप! जळगाव जामोदमधील २ ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 6, 2026
in राजकारण, जळगाव जिल्हा
0
बोदवड तहसीलदार नितीन कुमार देवरेंवर निलंबनाची कारवाई : नेमकं कारण काय?
बातमी शेअर करा..!

बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यातील दादुलगाव ग्रामपंचायतीच्या कथित अनियमित कारभाराप्रकरणी दोन तत्कालीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचे अधिकृत अभिलेख व्यवस्थित न ठेवणे, माहिती अधिकारांतर्गत मागणी करूनही आवश्यक कागदपत्रे व माहिती उपलब्ध करून न देणे तसेच शासकीय कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत अनिल सखाराम अंबडकार आणि विजय शंकर ढगे यांना निलंबित करण्यात आले आहे. जळगाव जामोद पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

दादुलगाव ग्रामपंचायतीच्या २०१७ पासूनच्या कारभाराबाबत ग्रामस्थांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. ग्रामपंचायतीचे अधिकृत दप्तर व अभिलेख अद्ययावत ठेवले जात नसल्याचा, तसेच माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करूनही नागरिकांना आवश्यक कागदपत्रे आणि माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

या कथित अनियमिततेविरोधात दादुलगावातील तरुणांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मानेगाव ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तब्बल ८० किलोमीटरचा पायी मशाल मोर्चा काढण्यात आला होता. ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली होती.

खुलासा असमाधानकारक ठरल्यानंतर निलंबन

या प्रकरणाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेत संबंधित ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. संबंधितांकडून प्राप्त झालेला खुलासा समाधानकारक नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर अखेर दोन्ही तत्कालीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

निलंबन काळात मुख्यालय सोडण्यास मनाई

निलंबित करण्यात आलेल्या दोन्ही ग्रामसेवकांना निलंबनाच्या कालावधीत मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालयाबाहेर जाता येणार नाही. तसेच निलंबन काळात खासगी व्यवसाय किंवा अन्य नोकरी करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तरुणांनी उभारलेल्या आंदोलनानंतर झालेल्या या कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. आता २०१७ पासूनच्या संपूर्ण कारभाराची सखोल चौकशी होणार का आणि या प्रकरणात आणखी कोणाची भूमिका समोर येणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

१०वी-ITI पास तरुणांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेत २,८६१ अप्रेंटिस पदांची भरती, भुसावळसाठी ५०० जागा

Next Post

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढला; तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा तडाखा; या ६ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढला; तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भुसावळमध्ये एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; चौघे ताब्यात, ७.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळमध्ये एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; चौघे ताब्यात, ७.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

November 6, 2026
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

ओबीसी उमेदवारांसाठी मोठा दिलासा; क्रिमी लेयर ठरवण्याचे निकष सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

November 6, 2026
गुडन्यूज ! धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने ३००० रुपयांनी घसरले

धनत्रयोदशीला सोने चांदीचे दर धडाम ; जळगाव सराफ बाजारात आजचे नवीन दर काय? जाणून घ्या

November 6, 2026
महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा तडाखा; या ६ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढला; तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ

November 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page