नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन बँकेने अप्रेंटिस पदांच्या तब्बल १ हजार ५०० जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीमुळे बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
१,५०० जागांसाठी भरती
इंडियन बँकेकडून देशभरातील विविध शाखांमध्ये अप्रेंटिस पदांच्या एकूण १ हजार ५०० जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी अशी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवीधरांनाही या भरतीत सहभागी होता येणार आहे.
वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क
या भरतीसाठी १ नोव्हेंबर २०२५ रोजी उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षे असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना ५ वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गातील (GEN), OBC आणि EWS उमेदवारांसाठी ८०० रुपये आहे. तर SC, ST आणि दिव्यांग (PWD) उमेदवारांसाठी १७५ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
२५ नोव्हेंबरपर्यंत अर्जाची संधी
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, ती नंतर कळविण्यात येणार आहे.
असा करा ऑनलाइन अर्ज
इच्छुक उमेदवारांनी इंडियन बँकेच्या अप्रेंटिस भरतीसाठी IBPS च्या अधिकृत नोंदणी पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्यासाठी लिंक : https://ibpsreg.ibps.in/inbraoct26/
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधर तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.















Discussion about this post