Thursday, November 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या खर्चावर रोहित पवारांचा सवाल; भ्रष्टाचाराचे आरोप करत महाजनांना दिला इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 5, 2026
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राजकारण
0
रस्ता खचला, पाहणी न करताच परतले; मंत्री महाजनांना रोहित पवारांनी सुनावलं, म्हणाले..
बातमी शेअर करा..!

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिकमध्ये सुरू असलेल्या विकासकामांवरून राजकीय वातावरण तापले आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली तब्बल ३५ हजार कोटी रुपयांचा खर्च दाखवला जात असताना प्रत्यक्षात कामांचा दर्जा मात्र निकृष्ट असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी तुलनेने कमी खर्च झाला असताना नाशिकमध्ये एवढा मोठा निधी नेमका कुठे खर्च होत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच या कामांमधील कथित भ्रष्टाचाराचा एक-एक रुपयाचा हिशोब घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवरून राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांवर निशाणा साधला. धर्माच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांकडून भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी विकासकामांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चांगल्या रस्त्यांची खोदकामे करून निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याने अपघातांमध्ये निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचेही ते म्हणाले.

३५ हजार कोटींचा हिशोब कुठे?

प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी अवघ्या हजार कोटींच्या आसपास खर्च झाल्याचा दावा करत नाशिकमध्ये ३५ हजार कोटी रुपयांचा खर्च नेमका कशासाठी केला जात आहे, असा सवाल रोहित पवार यांनी केला. या कामांमध्ये उत्तर प्रदेशमधून आलेले अधिकारी आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आणलेले अधिकारी सहभागी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

रिंगरोडच्या कंत्राटावरूनही त्यांनी गंभीर आरोप केले. या कामाचे कंत्राट आणि त्यातून मिळणारा आर्थिक फायदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नातेवाइकांच्या जवळच्या लोकांना होत असल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित कामांमध्ये ७ ते ८ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या प्रकरणातील सर्व बाबी समोर आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदूषित पाण्याच्या प्रश्नावर २० दिवसांची मुदत

गोदावरी नदीच्या पाण्याच्या स्वच्छतेचा मुद्दाही रोहित पवार यांनी उपस्थित केला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीचे पाणी स्वच्छ ठेवण्याबाबत मोठ्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात नदीत प्रदूषित पाणी मिसळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

रासायनिक सांडपाणी नदीत सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण विभागाला त्यांनी २० दिवसांची मुदत दिली. या कालावधीत योग्य ती कार्यवाही झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. या प्रकरणातही भ्रष्टाचार झाल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे सांगत प्रत्येक रुपयाचा हिशोब घेतला जाईल, असे ते म्हणाले.

अधिकाऱ्यांना १० दिवसांचा अल्टिमेटम

कुंभमेळ्याच्या कामांसंदर्भातील माहिती दडवली जात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. मंत्री गिरीश महाजन यांनी काही अधिकाऱ्यांना माहिती देऊ नये, अशा सूचना दिल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कुंभमेळा आयुक्त यांना पत्र दिले असून, आवश्यक माहिती देण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मंत्री महाजन यांनी जळगावमधील अधिकारी नाशिकमध्ये आणले, मग स्थानिक अधिकाऱ्यांना काम करण्याची संधी का दिली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सीसीटीव्ही अन् तांत्रिक तपासातून दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीचा भडका! सोनं ७ हजारांनी, तर चांदी १५ हजारांनी महागली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीचा भडका! सोनं ७ हजारांनी, तर चांदी १५ हजारांनी महागली

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात वाळू माफियांवर पोलिसांचा दणका; ५ गुन्हे दाखल, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात वाळू माफियांवर पोलिसांचा दणका; ५ गुन्हे दाखल, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

November 5, 2026
भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ

भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ

November 5, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

गोकुळ दूध संघाच्या वादात राहुल गांधींची उडी! भाजपवर केला जोरदार हल्लाबोल

November 5, 2026
जळगावकरांनो सावधान! अहमदाबादहून आलेला तब्बल २४० किलो खवा FDA ने पकडला

जळगावकरांनो सावधान! अहमदाबादहून आलेला तब्बल २४० किलो खवा FDA ने पकडला

November 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page