Thursday, November 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राष्ट्रीय महामार्ग ५३ वर दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची शिफारस

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 4, 2026
in जळगाव जिल्हा
0
राष्ट्रीय महामार्ग ५३ वर दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची शिफारस
बातमी शेअर करा..!

अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळण्यास होणार मदत

जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचा पुढाकार

जळगाव |  राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांमधील जीवितहानी रोखण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना वेळेत आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५३ वर दोन ॲडव्हांस लाईफ सपोर्ट (ALS) रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची शिफारस जिल्हा रस्ते सुरक्षा समितीने केली आहे. समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जळगाव प्रकल्प अंमलबजावणी कार्यक्षेत्रात (PIU) या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५३ हा पूर्व-पश्चिम मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचा महत्त्वपूर्ण दुवा आहे. या मार्गावर आंतरराज्यीय तसेच राज्यांतर्गत वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. परिणामी, अपघात घडल्यास जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळणे अत्यावश्यक ठरते. अपघातानंतरचा पहिला तास म्हणजेच ‘गोल्डन अवर’ हा जखमींचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने निर्णायक असतो. या कालावधीत योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यास जीवितहानी टाळण्यास मोठी मदत होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन महामार्गावरील आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्याची भूमिका समितीने घेतली आहे.

सध्या महामार्गावर उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका सुविधांवर गंभीर अपघातांमधील आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादाची वाढती गरज लक्षात घेता अतिरिक्त दोन ॲडव्हांस लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या रुग्णवाहिका अत्याधुनिक जीवनरक्षक उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सुसज्ज असणार आहेत. त्यामुळे अपघातस्थळीच जखमींना प्राथमिक तसेच आवश्यक वैद्यकीय उपचार देणे शक्य होणार आहे.
महामार्गावरील अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करणे, आपत्कालीन वैद्यकीय मदत मिळण्यास लागणारा वेळ घटविणे आणि प्रवाशांची सुरक्षितता जपणे, या व्यापक उद्देशाने जिल्हा रस्ते सुरक्षा समितीने ही शिफारस केली आहे. या सुविधेमुळे राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी कालोसे उद्यापासून दोन दिवस जळगाव जिल्हा दौऱ्यावर

Next Post

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत चौथ्या यादीत जळगाव जिल्ह्यातील ६,९७६ शेतकऱ्यांना ४५.७० कोटींचा लाभ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत चौथ्या यादीत जळगाव जिल्ह्यातील ६,९७६ शेतकऱ्यांना ४५.७० कोटींचा लाभ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजवले तर कारवाई? प्रशासनाचे कडक निर्देश

पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा; फटाक्यांच्या वापरावर निर्बंधांचे पालन करा – अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण

November 5, 2026
जळगावात रंगभूमी दिन उत्साहात साजरा; बालगंधर्व नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर

जळगावात रंगभूमी दिन उत्साहात साजरा; बालगंधर्व नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर

November 5, 2026
जळगावकरांनो लक्ष द्या! खान्देश मॉलकडून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता बंद

जळगावकरांनो लक्ष द्या! खान्देश मॉलकडून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता बंद

November 5, 2026
जळगावसह दहा रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ; हे आहे कारण?

दिवाळीच्या गर्दीमुळे मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मुंबईतील ५ प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद; १५ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध

November 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page