पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना खोकल्याचा त्रास होत असल्याने वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या सुरू असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून सततच्या खोकल्यामुळे त्रस्त होते. त्यातच त्यांनी अलीकडेच तीन दिवस दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शरद पवार हे दर महिन्याला नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये जातात. सोमवारी (२ नोव्हेंबर) दुपारी चारच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यानंतर पुढील वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून शरद पवार रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली. त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या सुरू असून प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पवार यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शरद पवार यांचे आगामी दुष्काळग्रस्त भागातील दौरेही रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पुढील दौऱ्यांबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.














Discussion about this post