मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, आता भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यातील वादाने राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर टीका केली जात असल्याने महायुतीतील संघर्षाची चर्चा रंगली आहे.
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर जोरदार टीका केली. बारा पक्ष फिरून आलेल्या माकड छापावर मी नाही पुष्कर तुळजापूरकर बोलतील” अशी रविंद्र धंगेकरांवर टिका केली. “मला ते डायनोसर म्हणतात, तो बलवान प्राणी आहे.रविंद्र धंगेकर याने फडणवीस यांच्यावर टिका करू नये ती त्यांची लायकी नाही.असं नवनाथ बनम्हणाले.
नवनाथ बन यांच्या या वक्तव्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर एक व्यंगचित्र पोस्ट केले. या चित्रात भाजपचे कार्यालय आणि पक्षाचे कमळ हे निवडणूक चिन्ह दाखवण्यात आले असून, एका व्यक्तीला कुत्र्याला पाव खाऊ घालताना दाखवण्यात आले आहे. या पोस्टसोबत धंगेकर यांनी नवनाथ बन यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. तसेच काही वादग्रस्त हॅशटॅगही दिले. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
धंगेकर यांची पोस्ट
“हि याची लायकी आणि चालला धंगेकरांशी पंगा घ्यायला चालला….!! अरे बेट्या तुझे मालक लोक पण वाकड्यात जात नाही आमच्या, कधी तुझी नसबंदी होईल कळणार सुद्धा नाही तुला. हि याची लायकी आणि चालला धंगेकरांशी पंगा घ्यायला चालला….!!” असं कॅप्शन धंगेकर यांनी या फोटोला दिलय. #बनश्वान #चिल्ला_पुकार #Paid_Animal असे हॅश टॅगही दिले आहेत.
हि याची लायकी आणि चालला धंगेकरांशी पंगा घ्यायला चालला….!!
अरे बेट्या तुझे मालक लोक पण वाकड्यात जात नाही आमच्या, कधी तुझी नसबंदी होईल कळणार सुद्धा नाही तुला.
#बनश्वान #चिल्ला_पुकार #Paid_Animal https://t.co/vsGpMDHOv5
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 31, 2026















Discussion about this post