Thursday, October 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

५० हजारांची मागणी, २० हजार स्वीकारले; रावेरमध्ये वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 29, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ
बातमी शेअर करा..!

रावेर । धरणातून गाळ काढण्याच्या कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याप्रकरणी रावेर वनपरिक्षेत्रातील वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. मंगरूळ धरणातून जेसीबीच्या साहाय्याने गाळ काढण्याच्या कामासाठी २० हजार रुपये स्वीकारताना वनरक्षकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.  रावेर-बऱ्हाणपूर मार्गावरील एका ज्यूस सेंटरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

जगदीश काशिनाथ जगदाळे (वय २७) असे ताब्यात घेण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. या कारवाईमुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली असून, सरकारी कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार रावेर येथे अर्थमूव्हर्स एजन्सी चालवतात. त्यांच्याकडे स्वतःचे जेसीबी मशीन आहे. तक्रारदाराच्या परिचित व्यक्तीने मंगरूळ धरणातून शेतीच्या उपयोगासाठी गाळ काढणे आणि त्याची वाहतूक करण्यासाठी पाटबंधारे उपविभागाकडून परवानगी घेतली होती. संबंधित ठिकाण वनरक्षक जगदाळे यांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने या कामाच्या अनुषंगाने लाचेची मागणी झाल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराच्या जेसीबी मशीनद्वारे गाळ काढण्याच्या कामासाठी २० हजार रुपये, तर परिचित व्यक्तीच्या ट्रॅक्टरद्वारे गाळ वाहून नेण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपये, अशी एकूण ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद होते. यानंतर तक्रारदाराने जळगाव एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली.

तक्रारीची पडताळणी करून सापळा

तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने बुधवारी रावेर शहरातील छोरिया मार्केट परिसरात पंचांच्या उपस्थितीत लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी जेसीबीद्वारे गाळ काढण्याच्या कामासाठी २० हजार रुपये मागितल्याचे आणि संबंधित रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे तपासात निष्पन्न झाले.

यानंतर एसीबीच्या पथकाने रावेर-बऱ्हाणपूर रस्त्यावरील एका ज्यूस सेंटर परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना वनरक्षक जगदाळे यांना पथकाने पकडले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.धरणातून गाळ काढण्यासारख्या कामात लाचेची मागणी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात या कारवाईची चर्चा सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विधानपरिषद निवडणुकीत कोण आघाडीवर अन् कोण पिछाडीवर? धक्कादायक निकाल आले समोर

Next Post

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका! ३ जागांवर विजय, महायुतीला २ जागा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला? कोणाला किती जागा मिळणार? पहा

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका! ३ जागांवर विजय, महायुतीला २ जागा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

रेल्वेत स्टेशन मास्टर होण्याची सुवर्णसंधी! १,२६५ पदांसाठी भरती; असा करा ऑनलाइन अर्ज

October 29, 2026
विधान परिषद निवडणूक निकालावरून महायुतीत वाद ; भाजपने पराभवाचे खापर शिंदेसेनेवर फोडले

विधान परिषद निवडणूक निकालावरून महायुतीत वाद ; भाजपने पराभवाचे खापर शिंदेसेनेवर फोडले

October 29, 2026
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला? कोणाला किती जागा मिळणार? पहा

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका! ३ जागांवर विजय, महायुतीला २ जागा

October 29, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

५० हजारांची मागणी, २० हजार स्वीकारले; रावेरमध्ये वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

October 29, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page