Monday, October 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

अमित शाह मानहानी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा; न्यायालयाने केली निर्दोष सुटका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 26, 2026
in राजकारण, राष्ट्रीय
0
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?
बातमी शेअर करा..!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीशी संबंधित मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. निकालाच्या वेळी राहुल गांधी स्वतः न्यायालयात उपस्थित होते.

या प्रकरणाची सुरुवात २०१८ मध्ये झाली होती. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी बंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याबाबत टिप्पणी केली होती. ही टिप्पणी मानहानीकारक असल्याचा आरोप करत भाजप नेते आणि सुल्तानपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विजय मिश्रा यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.

२०२३ मध्ये समन्स, २०२४ मध्ये जामीन

या प्रकरणाच्या सुनावणीनंतर २७ नोव्हेंबर २०२३ रोजी न्यायालयाने राहुल गांधी यांना आरोपी म्हणून समन्स बजावले होते. त्यानंतर २० फेब्रुवारी २०२४ रोजी राहुल गांधी सुल्तानपूर न्यायालयात हजर झाले. त्यावेळी त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या दोन मुचलक्यांवर जामीन मंजूर करण्यात आला होता.

राहुल गांधी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. हे प्रकरण सत्ताधारी पक्षाचे कारस्थान असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

तक्रारदारांसह तीन साक्षीदारांच्या जबान्या नोंदवल्या

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तक्रारदार विजय मिश्रा यांच्यासह अनिल मिश्रा आणि रामचंद्र दुबे या तीन साक्षीदारांच्या जबान्या नोंदवल्या होत्या. त्यानंतर सोमवारी न्यायालयाने राहुल गांधी यांची निर्दोष सुटका करण्याचा निर्णय दिला. या निकालामुळे २०१८ पासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावकरांनो, उकाड्यापासून मिळणार दिलासा? बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; ‘या’ तारखेपासून पावसाचे संकेत

Next Post

एकनाथ शिंदेंसह फडणवीसांचाही ‘गेम’ करण्याचा डाव? कथित क्लिपवरून मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला द्या नाहीतर.. मनोज जरांगेंचा सरकरला इशारा

एकनाथ शिंदेंसह फडणवीसांचाही ‘गेम’ करण्याचा डाव? कथित क्लिपवरून मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जनतेला विसरून सत्तेची फळे चाखण्यात व्यस्त; जळगावात अंबादास दानवेंचा मंत्री महाजनांवर घणाघात

जनतेला विसरून सत्तेची फळे चाखण्यात व्यस्त; जळगावात अंबादास दानवेंचा मंत्री महाजनांवर घणाघात

October 26, 2026
युको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ५०० पदांसाठी भरती

पदवीधरांसाठी खुशखबर! युको बँकेत 530 पदांसाठी भरती; 29 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

October 26, 2026
जेवण बनवून दिले नाही म्हणून मुलगा संतापला ! झोपेतच केली आईची निर्घृण हत्या

जेवण बनवून दिले नाही म्हणून मुलगा संतापला ! झोपेतच केली आईची निर्घृण हत्या

October 26, 2026
येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला द्या नाहीतर.. मनोज जरांगेंचा सरकरला इशारा

एकनाथ शिंदेंसह फडणवीसांचाही ‘गेम’ करण्याचा डाव? कथित क्लिपवरून मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

October 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page