नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज सुप्रीम कोर्टात दाखल झाले. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या) खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इंडिया आघाडीतील काही प्रमुख नेते उपस्थित होते.

राहुल गांधी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. त्यानंतर विरोधकांकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. यापूर्वी, विरोधी पक्षाच्या खासदारांनी कॉन्स्टिट्यूशन क्लबपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढला होता.

राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे नेते भगवान दास मार्गावरून सुप्रीम कोर्टाच्या दिशेने निघाले होते. मात्र, सुप्रीम कोर्टापासून अवघ्या सुमारे ४०० मीटर अंतरावर पोलिसांनी त्यांना अडवले. पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी आणि इतर नेते काही काळ त्याच ठिकाणी थांबले. त्यानंतर राहुल गांधी इंडिया आघाडीच्या नेत्यांसह तेथून माघारी फिरले.
राहुल गांधी इंडिया गेटच्या दिशेने जात असल्याचे दिसून आल्यानंतर ते आपल्या निवासस्थानाकडे परतत असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, राहुल गांधी यांनी पोलिसांना चकवा देत इंडिया गेटच्या सर्कलवरून टिळक रोडचा मार्ग पकडला आणि थेट सुप्रीम कोर्ट गाठले. त्यामुळे राहुल गांधींच्या या हालचालीने पोलिसांचीही चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वीच आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार ते सुप्रीम कोर्टात दाखल झाले. त्यांच्यासोबत मल्लिकार्जुन खरगे, डी.के. शिवकुमार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह इंडिया आघाडीतील नेते उपस्थित होते.
सुप्रीम कोर्टात पोहोचल्यानंतर राहुल गांधी आणि इतर नेते काही काळ तेथे थांबले. त्यानंतर ते पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या परिसरातून बाहेर पडले. राहुल गांधींच्या सुप्रीम कोर्टातील या प्रवेशामुळे राजधानीतील राजकीय घडामोडींना चांगलेच वेग आले असून, या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post