जळगाव । धम्मचक्र प्रवर्तन दिन-२०२६ निमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते नागपूरदरम्यान विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांच्या एकूण चार फेऱ्या होणार आहे. विशेष या गाड्यांना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा असणार असल्यामुळे प्रवर्तन दिनासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विशेष गाडी क्रमांक ०१०१९ ही १९ आणि २१ ऑक्टोबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दुपारी २.३० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

तर विशेष गाडी क्रमांक ०१०२० ही २० आणि २२ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर येथून रात्री १०.३० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
या विशेष गाड्यांचे थांबे आणि सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲपचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post