जळगाव : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा सन २०२५-२६ मध्ये लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील नूतनीकरण अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत समाज कल्याण विभागाच्या https://hmasnew.mahait.org या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले आहे. नूतनीकरण अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षाचे गुणपत्रक अपलोड करणे तसेच चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे.

स्वाधार योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अर्जांची विहित मुदतीत छाननी करणे आवश्यक आहे. त्यामुळे सन २०२५-२६ मध्ये योजनेचा लाभ घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत नूतनीकरण अर्ज सादर करावा. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास संबंधित विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता नूतनीकरण अर्ज ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
















Discussion about this post