जळगाव/नंदुरबार । ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना वाढत्या उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक जाणवत असून, नागरिक हैराण झाले आहेत.

एल निनोच्या प्रभावामुळे तापमानात वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. नंदुरबारमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्रता वाढत असून, सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत आहे. विशेषतः दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.

जळगावमध्येही ऑक्टोबरच्या सुरुवातीला तापमान वाढल्याने नागरिकांना उन्हाच्या चटक्याचा सामना करावा लागत आहे. जळगावच्या कमाल तापमानाने ३७ अंशाचा टप्पा गाठला असून पावसाळा संपत असतानाच वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.
तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या वेळी शक्यतो थेट उन्हात जाणे टाळावे, शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी पुरेसे पाणी प्यावे आणि उन्हापासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच वाढलेला उकाडा नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत असून, आगामी काळात तापमानाची स्थिती कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post