नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये (UIIC) विविध पदांसाठी तब्बल 225 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत आता 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता अर्ज करावा.

या भरतीअंतर्गत एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (स्केल-I) [जनरलिस्ट] पदाच्या 200 जागा आणि एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (स्केल-I) [हिंदी ऑफिसर] पदाच्या 25 जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता काय?
जनरलिस्ट पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान 60 टक्के गुण आवश्यक असून, SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी 55 टक्के गुणांची अट आहे.
हिंदी ऑफिसर पदासाठी इंग्रजी विषयासह हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. या पदासाठीही खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 60 टक्के, तर SC, ST आणि PWD उमेदवारांना 55 टक्के गुण आवश्यक आहेत.
वयोमर्यादा आणि शुल्क
30 जून 2026 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क म्हणून General, OBC आणि EWS उमेदवारांना 1,000 रुपये, तर SC, ST, Ex-Servicemen आणि महिला उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण भारतात कुठेही होऊ शकते. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
UIIC भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची आधीची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2026 होती. मात्र, आता ही मुदत वाढवण्यात आली असून उमेदवारांना 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post