Thursday, September 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

एरंडोलमधील सराईत टोळीवर कारवाईचा बडगा; पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने तिघे जिल्ह्याबाहेर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 24, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
एरंडोलमधील सराईत टोळीवर कारवाईचा बडगा; पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने तिघे जिल्ह्याबाहेर
बातमी शेअर करा..!

एरंडोल : एरंडोल शहर व परिसरात टोळी तयार करून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप असलेल्या गुन्हेगारी टोळीविरोधात जळगाव पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याची प्रवृत्ती असल्याच्या पार्श्वभूमीवर टोळीप्रमुखासह तिघांना तब्बल एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने झालेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टोळीप्रमुखासह तिघांवर जिल्हाबंदी

हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळीप्रमुख शुभम कैलास महाजन (१८, रा. नागोबा मढी, एरंडोल), पवन प्रकाश मराठे (१९, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) आणि शुभम उर्फ ‘झिंग्या’ दत्तात्रय पाटील (२५, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या तिघांविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५५ अन्वये कारवाई

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून संबंधित तिघांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आला होता. प्रस्तावासोबत संबंधितांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती आणि दाखल गुन्ह्यांचा तपशील सादर करण्यात आला.

या प्रस्तावाची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५५ अन्वये तिघांना एक वर्षासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या या कारवाईमुळे एरंडोल शहर व परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यास मदत होणार असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

IIT मुंबईतील साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण तापले; आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Next Post

राज्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याबाबतचा जीआर उद्या निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याबाबतचा जीआर उद्या निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

राज्यात 'कोरडा दुष्काळ' जाहीर करण्याबाबतचा जीआर उद्या निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याबाबतचा जीआर उद्या निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

राज्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याबाबतचा जीआर उद्या निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

September 24, 2026
एरंडोलमधील सराईत टोळीवर कारवाईचा बडगा; पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने तिघे जिल्ह्याबाहेर

एरंडोलमधील सराईत टोळीवर कारवाईचा बडगा; पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने तिघे जिल्ह्याबाहेर

September 24, 2026
IIT मुंबईतील साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण तापले; आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

IIT मुंबईतील साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण तापले; आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

September 24, 2026
२ ऑक्टोबर रोजी देशात ‘No UPI Day’; व्यापाऱ्यांनी का घेतलाय हा निर्णय?

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page