जळगाव । आंतरराष्ट्रीय बाजारातील सततच्या बदलांमुळे जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या शेवटी वाढलेले सोन्या-चांदीचे भाव आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अचानक गडगडल्याचे दिसून आले. या मोठ्या घसरणीमुळेसणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मागील शनिवारपर्यंत (१९ सप्टेंबर) सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम (विना जीएसटी) १ लाख ५३ हजार रुपये होता. आज यात १ हजार रुपयांची घसरण होऊन सोने १ लाख ५२ हजार रुपयांवर आले आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात विक्रमी ३ हजार रुपयांची कपात झाली असून, प्रतिकिलो (विना जीएसटी) २ लाख ४१ हजार रुपयांवर असणारी चांदी आता २ लाख ३८ हजार रुपयांवर आली आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सुवर्ण बाजारात सध्या सतत चढ-उतार सुरू असून, दरातील या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.















Discussion about this post