Thursday, September 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

रोजगारासाठी आले, पण काळाने गाठलं! ! शिरपूर-चोपडा मार्गावर चौघांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 17, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

धुळे । शिरपूर-चोपडा मार्गावरील सावेर गावाच्या शिवारात भरधाव ट्रकने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मध्य प्रदेशातील चौघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्याविरुद्ध थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतांमध्ये लुमरीया लालसिंग भिलाला (२५), इसराम कालू भिलाला (४८) दोन्ही रा. बुद्रा, ता. राजपूर, जि. बडवानी तसेच सुरेश रमेश कनासे (२६) आणि महेश लालसिंग कनासे (३१) दोन्ही रा. बालिया, ता. सनावद, जि. खरगोन, मध्य प्रदेश यांचा समावेश आहे.

एकाच दुचाकीवरून चौघे जात होते

मिळालेल्या माहितीनुसार,मृत चौघेही मध्यप्रदेशातील रहिवासी असून रोजगारासाठी शिरपूर तालुक्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. इसराम भिलाला हे तिघांना सोबत घेऊन एमपी-१०-झेडएन-३२२६ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून शिरपूरहून चोपड्याकडे जात होते. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सावेर गावाच्या शिवारात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एचआर-५५-एटी-१३५५ क्रमांकाच्या मालमोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक एवढी भीषण होती की, मोटारसायकलवरील चौघांनाही गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर मालमोटार चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमींना तातडीने शिरपूर तसेच धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना चौघांचाही मृत्यू झाला.

फरार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी पन्नालाल कालूराम सिसोदिया (रा. बुद्रा, ता. राजपूर, जि. बडवानी) यांनी १६ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा थाळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच शिरपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, थाळनेर पोलिस ठाण्याचे अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलिस उपनिरीक्षक हर्षल पाटील यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, या अपघातामुळे शिरपूर-चोपडा मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. चौघेही मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याने त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या फरार मालमोटार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ISRO मध्ये १०वी, ITI उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; पगार ₹१.४२ लाखांपर्यंत मिळणार

Next Post

ज्वारी-मका-बाजरी उत्पादकांनो लक्ष द्या! हमीभावाने खरेदीसाठी या तारखेपर्यत करा नोंदणी?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ज्वारी, मका व बाजरी खरेदीसाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणी मुदतीत वाढ ; ही आहेत शेवटची तारीख?

ज्वारी-मका-बाजरी उत्पादकांनो लक्ष द्या! हमीभावाने खरेदीसाठी या तारखेपर्यत करा नोंदणी?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! लोकसभेतील विरोधकांच्या १५ खासदारांचे निलंबन, नेमकं कारण काय?

राज्यसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता ; ‘या’ १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार

September 17, 2026
जळगावात सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ

जळगावात सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ

September 17, 2026
ज्वारी, मका व बाजरी खरेदीसाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणी मुदतीत वाढ ; ही आहेत शेवटची तारीख?

ज्वारी-मका-बाजरी उत्पादकांनो लक्ष द्या! हमीभावाने खरेदीसाठी या तारखेपर्यत करा नोंदणी?

September 17, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

रोजगारासाठी आले, पण काळाने गाठलं! ! शिरपूर-चोपडा मार्गावर चौघांचा मृत्यू

September 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page