दिल्ली उच्च न्यायालयात नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. न्यायालयाने सिनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट या पदांसाठी भरती जाहीर केली असून, एकूण 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.


या भरतीमध्ये सिनियर पर्सनल असिस्टंट पदाच्या 117 जागा, तर पर्सनल असिस्टंट पदाच्या 33 जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता
सिनियर पर्सनल असिस्टंट : उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी शॉर्टहँडमध्ये 110 शब्द प्रति मिनिट आणि संगणकावर टायपिंगचा वेग 40 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे.
पर्सनल असिस्टंट : या पदासाठीही उमेदवार पदवीधर असावा. इंग्रजी शॉर्टहँडचा वेग 100 शब्द प्रति मिनिट आणि संगणकावर टायपिंगचा वेग 40 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी 1 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 32 वर्षे असावे. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क
General/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1,500 रुपये, तर SC/ST/PWD उमेदवारांसाठी 1,300 रुपये आहे.
नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांना नवी दिल्ली येथे नियुक्ती मिळणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2026 रात्री 11 वाजेपर्यंत आहे. अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची संधी 12 ते 14 ऑक्टोबर 2026 रात्री 11 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्जाची अंतिम मुदत लक्षात घेऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.















Discussion about this post