Wednesday, September 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

निकालाला विलंब होत असेल तर..; उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी मागणी!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 8, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान
बातमी शेअर करा..!

मुंबई : शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी भूमिका मांडली आहे. धनुष्यबाण चिन्हाबाबतच्या प्रकरणाचा निकाल लागण्यास आणखी वेळ लागणार असेल, तर हे निवडणूक चिन्ह तात्काळ गोठवण्यात यावे, अशी मागणी ठाकरेंनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले.

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून सध्या शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरेंनी निकालास होणाऱ्या विलंबावर प्रश्न उपस्थित केला.

“या खटल्याला चार वर्षे झाली आहेत. या काळात अनेक निवडणुका पार पडल्या. तरीही प्रकरणाचा अंतिम निकाल झालेला नाही. त्यामुळे कोणत्याही कारणाने निकालाला आणखी वेळ लागणार असेल, तर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवून टाकावे,” अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

‘आम्हाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळायला हवे’

सत्ताधाऱ्यांवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला मिळायला हवे, अशी भूमिका पुन्हा स्पष्ट केली. आपल्याकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह बोगस पद्धतीने काढून घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. धनुष्यबाण या चिन्हाचा गैरवापर करून सत्ता मिळवण्यात आली आणि त्यानंतर गैरकारभार करण्यात आला, असा आरोप ठाकरेंनी केला. त्यामुळे या चिन्हाचा दुरुपयोग रोखण्यासाठी योग्य ती कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सण-उत्सवातील डीजेच्या गोंगाटावरही भाष्य

दरम्यान, सण-उत्सवांच्या काळात होणाऱ्या डीजेच्या मोठ्या आवाजावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. प्रत्येकाला सण आणि उत्सव हवेत, मात्र कोणालाही अनावश्यक गोंगाट नको, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ डीजेच्या गोंगाटाविरोधातील भूमिकेला पाठिंबा म्हणून घेतला जात आहे.

महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधानांचा फोटो नको

महापुरुषांच्या प्रतिमांच्या शेजारी पंतप्रधानांचा फोटो लावण्याच्या मुद्द्यावरही ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही परिस्थितीत महापुरुषांच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो नको, असे त्यांनी म्हटले. या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू असताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या या मागणीमुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

५१ हजारांचे बक्षीस जाहीर, दिले ५१०० रुपये; जळगावात गोविंदांचा हंडीखालीच ठिय्या

Next Post

तुरीच्या शेतात गांजाची लागवड; अडावद पोलिसांची धडक कारवाई, १७५ झाडे जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तुरीच्या शेतात गांजाची लागवड; अडावद पोलिसांची धडक कारवाई, १७५ झाडे जप्त

तुरीच्या शेतात गांजाची लागवड; अडावद पोलिसांची धडक कारवाई, १७५ झाडे जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय

निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय

September 9, 2026
पुतण्याच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचले; आता मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला भयंकर अनुभव

पुतण्याच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचले; आता मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला भयंकर अनुभव

September 9, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगावच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! रब्बी ज्वारी, हरभरा, मसूरसाठी मिळणार अनुदान

September 9, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

खेळाडूंपासून ते आरोग्यापर्यंत..; राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ७ महत्त्वाचे निर्णय

September 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page