Saturday, September 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणचा दणका! जळगावात २८ जणांवर थेट गुन्हे दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 5, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणचा दणका! जळगावात २८ जणांवर थेट गुन्हे दाखल
बातमी शेअर करा..!
जळगाव : स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांचा थकबाकीपोटी महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. मात्र या ग्राहकांनी वीजबिल न भरता परस्पर जोडणी घेऊन वीजचोरी केली. ऑगस्ट महिन्यात जळगाव विभागातील अशा 28ग्राहकांवर महावितरणने थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.
महावितरणकडून स्मार्ट मीटरद्वारे थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा ऑटो डिस्कनेक्ट (आपोआप खंडित) केल्यानंतर ग्राहकाने बिल भरल्यास तात्काळ तो रिकनेक्ट केला जातो. मात्र काही ग्राहक ऑटो डिस्कनेक्शनंतरही बिले भरत नसल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले. हे ग्राहक खरोखर अंधारात आहेत की चोरून वीज वापरत आहेत याची पडताळणी करण्यासाठी जळगाव विभाग कार्यालयाने धडक मोहीम सुरू केली. यात तब्बल 28 ग्राहक बिल न भरताच अनधिकृतरीत्या वीज वापरताना आढळून आले. या प्रकरणी सर्वांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपींमध्ये नशिराबाद येथील शेख इरफान शेख खलिल पिंजारी, शेख अज‍िम शेख युसूफ, भादली बु. येथील श्रीधर नारायण ठाकूर, नारायण विठ्ठल जावळे, गोपिकाबाई सखाराम पाटील, मोतीराम लक्ष्मण पाटील, शिवाजी कडू कोळी, जंगले सुपडू सपकाळे, उषाबाई गणेश कोळी, डोमगाव येथील मुरलीधर गिरधर महाले, दिगंबर प्रभाकर जाधव, जळगावातील प्रतिभा रितेश पवार, लक्ष्मी भानुदास बागडे, स्वप्नील प्रशांत सौंदाणे, देवीदास गणपतराव शिंदे, शेख रफिक हबीब, शाहरूख खान पठाण, संजय भगवान महाजन, अकीब शाह अब्दुल रहमान शाह, गणी चिंधा पटेल, शेख आरिफ बिस्मिल्ला, मोहंमद इरफान तांबोळी, शफी गफूर पटेल, शेख कय्युम हुसेनखा, दिलीप सूरजमल लाठी, नवीद जमील शेख, मनीषा विनोद जोशी व रसुबाई तुकाराम पाटील यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींनी 11 हजार 606 युनिट वीजचोरी करून महावितरणचे 2 लाख 69 हजार 575 रुपयांचे नुकसान केले. सर्व 28 आरोपींवर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
ही कारवाई मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रेय साळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. दरम्यान, थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी आपली वीजबिले तातडीने भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित‍ केलेल्या ग्राहकांची पडताळणी करण्यासाठी महावितरणने पथके स्थापन केली आहेत. वीजपुरवठा परस्पर जोडल्याचे या पथकांना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. तसेच अनधिकृतपणे वीजपुरवठा जोडल्यास प्राणांतिक अपघाताचाही धोका आहे. त्यामुळे वीजपुरवठा अनधिकृतरीत्या जोडू नका. वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना शेजाऱ्यांनीही अनधिकृतरीत्या वीजपुरवठा देऊ नये. नसता त्यांचाही वीजपुरवठा खंडित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महावितरणने कळवले आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

कोळसा चोरणारी ८ जणांची टोळी भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात ; २.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मी पण गुलाब गुरुजी झालो असतो… पण ; मंत्री गुलाबराव पाटीलांनी सांगितलं भन्नाट किस्सा

जशी भाजपवाले माणसं फोडतात, तशी तुम्ही..; मंत्री गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना अजब सल्ला

September 5, 2026
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणचा दणका! जळगावात २८ जणांवर थेट गुन्हे दाखल

वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणचा दणका! जळगावात २८ जणांवर थेट गुन्हे दाखल

September 5, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

कोळसा चोरणारी ८ जणांची टोळी भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात ; २.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page