Saturday, September 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नशिराबादच्या कुख्यात गुंडावर एमपीडीएची कारवाई; वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 5, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
नशिराबादच्या कुख्यात गुंडावर एमपीडीएची कारवाई; वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी
बातमी शेअर करा..!

जळगाव । नशिराबाद परिसरात वारंवार दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंडाविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शोएब शेख गुलाम नबी ऊर्फ ‘शोएब बिल्डर’ (वय ३५, रा. ख्वाजा नगर, नशिराबाद) याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करून पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले.

शोएब बिल्डरविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, चोरी, रस्त्यात अडवून मारहाण करणे, शस्त्रांचा वापर करून हल्ला करणे तसेच हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणांमुळे परिसरात त्याची दहशत निर्माण झाली होती.

पोलिसांकडून यापूर्वी त्याच्यावर विविध प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. तसेच हद्दपारीची कारवाईही झाली होती. मात्र, त्यानंतरही त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा बसला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.

नशिराबाद पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता एम. नारखेडे यांनी शोएब बिल्डरच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आढावा घेत त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हादंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.

प्रस्तावातील कागदपत्रे आणि उपलब्ध गुन्हेगारी नोंदींची छाननी केल्यानंतर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी शोएब बिल्डर याच्यावर ४ सप्टेंबर रोजी एक वर्षाच्या स्थानबद्धतेचे आदेश जारी केले. आदेश प्राप्त होताच नशिराबाद पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याची रवानगी थेट येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे करण्यात आली.

शोएबविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दोन जबरी चोरीचे गुन्हे, रस्ता अडवून घातक शस्त्राने गंभीर मारहाण आणि हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन असे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे, पोलिस उपनिरीक्षक प्रिया दातीर, पोलिस अंमलदार गुणवंत देशमुख, प्रशांत विरणारे, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, प्रवीण लोहार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार सुनील दामोदरे यांच्या पथकाने कारवाईची अंमलबजावणी केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे नशिराबाद परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दहीहंडीच्या उत्सवावर पावसाचे सावट! उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांसह सरींचा अंदाज

Next Post

अभियांत्रिकी पदवीधरांसाठी केंद्र सरकारी नोकरीची संधी! 1748 जागांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१०वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३९४८१ पदांसाठी सुरूय भरती

अभियांत्रिकी पदवीधरांसाठी केंद्र सरकारी नोकरीची संधी! 1748 जागांवर भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३९४८१ पदांसाठी सुरूय भरती

अभियांत्रिकी पदवीधरांसाठी केंद्र सरकारी नोकरीची संधी! 1748 जागांवर भरती

September 5, 2026
नशिराबादच्या कुख्यात गुंडावर एमपीडीएची कारवाई; वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी

नशिराबादच्या कुख्यात गुंडावर एमपीडीएची कारवाई; वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी

September 5, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

दहीहंडीच्या उत्सवावर पावसाचे सावट! उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांसह सरींचा अंदाज

September 5, 2026
ठिबक व तुषार सिंचन संचाच्या कार्यक्षम वापराबद्दल हिवरखेडा बु. ग्रामपंचायतीचा दिल्लीत गौरव

भागपूर उपसा सिंचन योजनेला वेग ! जामनेर-पाचोरा तालुक्यातील १,३९५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार!

September 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page