Saturday, October 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

त्या बंडखोर २० खासदारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; नोटीस बजावत अपात्रतेच्या याचिकेवर उत्तर मागितले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 25, 2026
in राजकारण, राष्ट्रीय
0
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला (TMC) सोडचिठ्ठी देऊन नॅशनल पीपल्स काँग्रेस ऑफ इंडिया (NCPI) मध्ये प्रवेश करणाऱ्या २० बंडखोर खासदारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या सर्व बंडखोर खासदारांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नोटीस बजावत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

टीएमसीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी या २० बंडखोर खासदारांना लवकरात लवकर अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.

पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाईची मागणी

अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या याचिकेत संविधानाच्या १० व्या अनुसूचीनुसार (पक्षांतरबंदी कायदा) या खासदारांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. टीएमसीने जून महिन्यातच या खासदारांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, दोन महिने उलटूनही लोकसभा अध्यक्षांकडून यावर कोणतीही ठोस सुनावणी किंवा निर्णय झाला नसल्याने टीएमसीने आक्रमक भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

‘आमचा वेळ कापला जातोय’ – अभिषेक बॅनर्जींचा आरोप

याचिकेत अभिषेक बॅनर्जी यांनी मांडले की, “या बंडखोर खासदारांना अद्याप स्वतंत्र गट म्हणून अधिकृत मान्यता मिळालेली नाही. तरीही जेव्हा ते सभागृहात बोलतात, तेव्हा त्यांचा वेळ टीएमसीच्या निर्धारित वेळेतून कापला जातो, जो अत्यंत अन्यायकारक आहे. जर त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यायची असेल किंवा अपात्र ठरवायचे असेल, तर तो निर्णय तातडीने घेतला पाहिजे.”

लोकसभा अध्यक्षांची बाजू

या प्रकरणात लोकसभा अध्यक्षांनाही पक्षकार करण्यात आले आहे. अध्यक्षांच्या वतीने हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला माहिती दिली की, “लोकसभा अध्यक्षांनी या प्रकरणात आधीच कारवाई सुरू केली असून सर्व संबंधित खासदारांकडून उत्तर मागितले आहे.” तसेच अध्यक्षांना थेट नोटीस न बजावण्याची विनंती त्यांनी केली, जी न्यायालयाने मान्य केली.

आता या २० बंडखोर खासदारांच्या उत्तरावर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावच्या उद्योगांसाठी मोठा निर्णय; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे डॉ. उदय सामंत यांचे आदेश

Next Post

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
घरात मृत अवस्थेत पशुधन अधिकारी आढळला ; यावल शहरात खळबळ

अमळनेर तालुक्यात तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू; परिसरात खळबळ

October 17, 2026
युको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ५०० पदांसाठी भरती

युको बँकेत अप्रेंटिस पदांच्या 530 जागांसाठी भरती ; पदवीधरांना मोठी संधी

October 17, 2026
नशिराबादमध्ये उघड्या तलवारीने दहशत माजवणाऱ्या तरुण जेरबंद

नशिराबादमध्ये उघड्या तलवारीने दहशत माजवणाऱ्या तरुण जेरबंद

October 17, 2026
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

एकनाथ शिंदे ‘भाकरी फिरवणार’? मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची चर्चा; तरुण आमदारांना मिळणार संधी?

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page