भारतीय रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्डामार्फत (RRB) ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट या पदांसाठी एकूण 4,029 जागांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 13 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे.
पदांचा तपशील
ज्युनियर इंजिनिअर/डेपो मटेरियल सुपरिटेंडंट : 3,994 जागा
केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट : 35 जागा
शैक्षणिक पात्रता काय?
ज्युनियर इंजिनिअर पदासाठी संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आहे. यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, प्रॉडक्शन, ऑटोमोबाईल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, मॅन्युफॅक्चरिंग, मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग यांसह संबंधित शाखांचा समावेश आहे.
डेपो मटेरियल सुपरिटेंडंट पदासाठी कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आहे.
तर केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट पदासाठी Physics आणि Chemistry विषयांसह B.Sc. पदवी आवश्यक आहे.
वयाची अट
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षांदरम्यान असावे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत मिळणार आहे.
अर्ज शुल्क किती?
सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये अर्ज शुल्क आहे. तर SC, ST, माजी सैनिक, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क आहे.
संपूर्ण भारतात नोकरीची संधी
या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे देशभरातील पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता ऑनलाइन अर्ज करावा. 13 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया बंद होणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे आहे.















Discussion about this post